ताज्या बातम्या

वादळी वार्‍याने अंजनवतीत मोठे नुकसान

विजेचे खांब पडले, घरावरचे पत्रे उडाले
नेकनूर (रिपोर्टर):- गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून रात्री नेकनूर व परिसरात वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. काही ठिकाणचे विजेचे खांब कोलमडून पडल्याने या परिसरात विज पुरवठा खंडीत झाला होता. अंजनवती येथील अनेक नागरिकांचे वादळी वार्‍यामुळे मोठे नुकसान झाले.
काल संध्याकाळच्या दरम्यान अंजनवती व परिसरात वादळी वार्‍याने अमोल चव्हाण यांच्या घरासमोरील झाडे उनमळून पडले. तर काही शेतकर्‍यांच्या कडब्याच्या गंजी उडून गेल्या. अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले. विजेचे खांब पडल्याने या भागातील विज पुरवठा खंडीत झाला होता. या वादळी वार्‍याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने याचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review