ताज्या बातम्या

बीडच्या शेतकर्‍यांचे पुण्याच्या इन्शूरन्स कार्यालयासमोर आंदोलन

बीडच्या शेतकर्‍यांचे पुण्याच्या इन्शूरन्स कार्यालयासमोर आंदोलन
ठोस आश्‍वासन दिल्याशिवाय उठणार नाही -थावरे 
पुणे (रिपोर्टर):- खरीप हंगामामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पीक विमा भरला होता. यातील सोयाबीनला विमा देण्याचे इन्शूरन्स कंपनीने टाळल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होऊनही विमा का दिला नाही ? असा जाब विचारत सोयाबीनला विमा देण्याची हमी द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बीडच्या शेतकर्‍यांनी गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कंपनी ठोस आश्‍वासन देत नाही तोपर्यंत कार्यालयासमोर आंदोलन सुरू राहील, असे थावरे यांनी सांगितले. 
    लाखो शेतकर्‍यांनी खरीप हंगामामध्ये विमा भरला होता. यवर्षी पाऊस पडला नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. खरीपासह रब्बी पीक वायाला गेले. काही दिवसांपूर्वी ओरिएण्ट इन्शूरन्स कंपनीने शेतकर्‍यांना विमा दिला मात्र यात सोयाबीनच्या पिकाला वगळण्यात आले. जिल्ह्यात कापसानंतर सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होते. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी विमाही भरला होता. दुष्काळाने सोयाबीनचे पीक हाती आले नसताना विमा कंपनीने सोयाबीन पीकाला विम्यातून वगळल्याने शेतकर्‍यांना याचा आर्थिक फटका बसला. सोयाबीनचा विमा घोषित करण्यात यावा या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील पुणे-मुंबई हायवेवर असलेल्या ओरीएण्ट कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कंपनी ठोस आश्‍वासन देत नाही तोपर्यंत कार्यालयासमोरून उठणार नसल्याचा पवित्रा गंगाभीषण थावरे यांनी घेतला आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review