ताज्या बातम्या

अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
बीड (रिपोर्टर):- तालुक्यातील उमरद जहॉंगीर शिवारातील प्रेमचंद आसाराम आहेर यांच्या शेतात एका ३४ वर्षीय अनोळखी इसमाने आज सकाळी वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. 
उमरद जहॉंगीर शिवारात ३७ वर्षीय इसमाने लिंबाच्या झाडाला ठिबकच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती उमरद जहॉंगीरचे सरपंच दिलीप आहेर यांनी ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर ठाणेप्रमुख एपीआय सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो.नाईक भागवत शेलार, ढाकणे, आय बाईकचे गुज्जर आणि शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सदरील मयत इसमाच्या अंगावर पांढर्‍या रंगाचे शर्ट, काळ्या रंगाची पँट व पायात बिन्नो कंपनीची चप्पल आहे, मयत इसमाच्या डोक्यावरील केस काढलेले आहे. या वर्णणाच्या इसमाला कोणी ओळखत असेल तर त्यांनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेप्रमुख एपीआय सुजित बडे (मो. ७३५०८६८१००) व पो.नाईक भागवत शेलार (मो. ९७६४५८६८५५) या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review