ताज्या बातम्या

हाच का ‘सबका साथ सबका विकास’ गांधीनगर भागातील नाल्या मुरुम टाकून बुजविल्या

हाच का ‘सबका साथ सबका विकास’
गांधीनगर भागातील नाल्या मुरुम टाकून बुजविल्या 
रस्त्यावर गटाराचे घाण पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बीड (रिपोर्टर) :- शहरात भुयार गटार योजना राबविण्यासाठी कधी नव्हे ते बनवलेले रस्ते फोडले जात आहेत. गांधी नगर भागात पहिल्यांदाच नाल्याचे काम करण्यात होते. मात्र भुयार गटार योजनेचे काम करण्यासाठी चक्क जमिनीवरच्या नाल्या मुरुम टाकूण बुजविण्यात आल्या आहेत. त्यामुळे गांधीनगर भागातील हजरत शहेनशाहनगर, नुर कॉलनी, अख्तर नगर भागात गटाराचे घाण पाणी रस्त्यावर येत आहेत. 
यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तत्काळ नाल्या साफ करण्याची मागणी होत आहे.
 भुयार गटार योजना राबविण्यापूर्वीच शहरातील अनेक भागता नव्याने करण्यात आले होते. आत ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याची वाट लागली आहे. गांधी नगर भागात अद्याप रस्ते झालेले नसले तरी काही भागात नाल्याचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र येथे भुयार गटार योजना राबवितांना येथील नाल्यात चक्क मुरुम टाकून बुजविल्या आहेत. यामुळे रस्त्यावर घाण पाणी साचत असून याच घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढत पुढे जावे लागत आहे. त्यामुळे येथील नाल्यात टाकलेला मुरुम तत्काळ काढून नाल्या साफ कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. अन्यथा येथील नागरिक न.प.च्या विरोधात तिव्र आंदोलन करतील असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
चौकट..
विरोधकांची निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी
गांधीनगर भागात रस्ते- नाल्या, विद्युत पुरवठा, पथ दिवे, पाणी प्रश्‍न, घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव, डुक्करांचा वावर अशा एक ना अनेक समस्या या भागात आहेत. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहेत. मात्र निवडणूकीच्या काळात येथील नागरिकांची मते लाटण्यासाठी आम्हाला तुमचा किती पुळका आहे. हे दाखविण्यासाठी स्टंटबाजी करतात मात्र आता हे प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणीच पुढे येत नाही.
नगरसेवकांचे दुर्लक्ष, नागरीक भोगतात नरक यातना
गांधीनगर भागातील नागरीकांना अद्यापही कुठल्याच नागरी सुविध्दा पुरवण्यात आलेल्या नाहीत. निवडणुकीच्या काळात आम्ही हे करु ते करु म्हणून येथील नगरसेवकांना नागरिकांना विविध आश्‍वासने देत त्यांची मते मिळविली. मात्र निवडूण आल्यानंतर गांधीनगर भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे  येथील नागरिक नरक यातना भोगत आहेत. मात्र याचे कसलेच सोयर सुतक येथील नगरसेवकांना नाही.

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review