ताज्या बातम्या

शेतकर्‍यांनो, शासनाच्या योजनांचा लाभ घ्या -ना.क्षीरसागर 

शेतकर्‍यांनो, शासनाच्या योजनांचा लाभ घ्या -ना.क्षीरसागर 
भंडीशेगावात क्षीरसागरांनी केला शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार
भंडीशेगाव (रिपोर्टर):-राज्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाने विविध योजना आणल्या असून शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री ना. जयदत्त क्षीरसागर यांनी केले. 
  ते पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्हा दौर्‍यावर असताना पंढरपूर नजीकच्या भंडीशेगाव येथे वारकर्‍यांशी संवाद साधत होते. रोजगार हमी व फलोत्पादन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध शेतकरी उपयोगी योजनांचा प्रचार व प्रसार शुभारंभ या वेळी ना. जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी ह.भ.प. बोधले महाराज यांच्या दिंडीतील वारकर्‍यांसोबत ना. क्षीरसागरांनी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. ५० हजार रुपयांच्या शेततळ्यासाठी आता ९० ते ९५ हजार रुपयांचा निधी वाढवला आहे. ठिबकसाठी ५० टक्के अनुदान होते ते अनुदान आता ८० टक्क्यांवर नेण्यात आले आहे. फलोत्पादन योजनांमध्ये मोठी सुधारणा केल्याचेही या वेळी ना. क्षीरसागरांनी म्हटले. राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी आणि शेतीसाठी ज्या योजना आखल्या आहेत त्या योजना सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचाव्यात आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदात्त हेतुने ना. क्षीरसागरांनी कार्यक्रम हाती घेतला असून ते दिंडीच्या माध्यमातून उपस्थित वारकर्‍यांना याची माहिती देत आहेत. राज्य सरकारचे ते एकमेव मंत्री असतील जे की, लोकांना शासनाच्या योजना पटवून सांगत आहेत. 
 

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review