ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील भिंती गुटख्याने रंगल्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील भिंती गुटख्याने रंगल्या
पाण्डेय साहेब, कार्यालयात फेरफटका मारा 
बीड (रिपोर्टर):- जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय हे स्वच्छतेचे चाहते म्हणून ओळखले जातात. त्यांना कार्यालयात आणि कार्यालयीन परिसरात अजितबात घाण जमत नाही. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मध्यवर्ती इमारतीकडे कर्मचार्‍यांनी पुड्या खावून भिंती रंगबेरंगी केल्या आहेत. याच कार्यालयातील  विद्युत लाईट फिटींगमद्ये पुड्यांचे पाऊच टोचून ठेवण्याचा लाजीरवाना प्रकार दिसून आला. स्वच्छतागृहात तर सगळीकडे पुड्या खावून पिचकार्‍या मारलेल्या दिसून येतात. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या कॅबिनसोबतच प्रशासकीय इमारतीतही कधीतरी फेरफटका मारावा आणि स्वच्छतेचा आँखोदेखा हाल जाणून घ्यावा. 
    काल प्रस्तूत प्रतिनिधीने जिल्हा परिषदेच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये फेरफटका मारला असता ज्या ठिकाणाहून जिल्ह्याचा कारभार हाकला जातो अशा प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक विभागातील भिंती आणि कोपरे बाबा, गोवासारख्या पुड्या खावून रंगवलेल्या दिसून येतात. स्वच्छतागृहात डोकावून पाहिले तर अख्खे स्वचछतागृह थंकून लालीलाल झाले होते. तर याठिकाणी लाईट फिटींगच्या पट्‌ट्यामध्ये आणि बोर्डामध्ये पुड्यांचे पाऊच टोचून ठेवलेले दिसून आले. बीडला जिल्हाधिकारी म्हणून अस्तिककुमार पाण्डेय रुजू होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाची रंगवलेली भिंत स्वत: जिल्हाधिकारी पाण्हेय पुसतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी जिल्हाधिकारी स्वच्छतेचे चाहते आहेत त्यामुळे इथून पुढे जिल्हा प्रशासनाच्या इमारतीत घाण दिसून येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. 

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review