ताज्या बातम्या

कंटेनर चालकाने पाण्याच्या टाक्या परस्पर विकल्या

कंटेनर चालकाने पाण्याच्या टाक्या परस्पर विकल्या
दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल
दिंद्रुड (रिपोर्टर):- औरंगाबाद येथिल एका खासगी ट्रान्सपोर्टच्या दोन कंटेनर गाड्या नागपूरहून प्लॅस्टो कंपनीच्या ८० टाक्या कोल्हापूर येथे नेत असताना माजलगाव ते तेलगांव रस्त्यावर विकल्या प्रकरणी दिंद्रुड पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     सविस्तर माहिती अशी की औरंगाबाद येथील सेंट्रल इंडिया नामक ट्रान्सपोर्ट च्या शेकडो गाड्या महाराष्ट्र भर व्यवसाय करतात,यातच यांच्याकडे वाहन चालवणारे चालक महाराष्ट्रातुन रोजीरोटी कमावण्यासाठी या ट्रान्सपोर्ट कडे कामाला आहेत, माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील चालक असलेल्या विठ्ठल कराड याने नागपूरहून प्लॅस्टो कंपनीच्या सिनटेक्स टाक्या भरलेली गाडी कोल्हापूर ला जातांना स्वत:च्या गावाकडे नेली.योगायोगाने पाऊस पडल्याने गाडी पलटी झाली आणि वाहनचालकाची नियत फिरली एम एच २० सिटी ६२४ या कंटेनर गाडीतील प्रती १ टाकी ५०० रुपयांप्रमाणे १२ टाक्या विकल्या. इतक्यावरच न थांबता या चालकाने सोबती असलेल्या बाळु चुन्नीलाल चव्हाण याच्या वाहन क्र. एम एच २० सिटी ५२८२ कंटेनर मधील ६८ टाक्याही विकायला लावल्याचे
गाडी मालक विखर अहेमद सिद्दीकी यांच्या फिर्यादी वरुन दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दिंद्रुड पोलिसांनी तात्काळ दखल घेत माजलगाव ते दिंद्रुड परिसरातील गावागावात जाऊन जवळपास ५०च्या वर टाक्या जप्त केल्या आहेत. उर्वरित सिनटेक्स टाक्या लवकरात लवकर जप्त करण्यात येणार असल्याची माहिती दिंद्रुड पोलीस स्टेशन चे सपोनी सचिन पुंडगे यांनी दिली असुन वाहन चालक बाळु चुन्नीलाल चव्हाण यास अटक केली तर विठ्ठल कराड हा वाहनचालक फरार असल्याचे पुंडगे यांनी सांगितले. याप्रकरणात पोलिसांची सतर्कता कामाला आली असुन ५० टाक्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी अथक परिश्रम घेतले आहेत. पुढील तपास सपोनी सचिन पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉनिस्टेबल चौरे, सरवदे, रवि केंदे, गणेश जाधव, आकाश जाधव, बनसोडे करत आहेत.

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review