ताज्या बातम्या

लोक म्हणू लागले अब की बार संदीप क्षीरसागर बीडचे आमदार

आजी, तब्बेत कशी आहे, काका सध्या काय चालू आहे, मुलं कुठल्या वर्गात आहेत.? पाणी येतं का अडचणी संागा म्हणत संदीप क्षीरसागर घराघरात पोहचले
लोक म्हणू लागले अब की बार संदीप क्षीरसागर बीडचे आमदार
बीड (रिपोर्टर):- राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यात राजकारणाचं थोरलं घर म्हणून ज्या क्षीरसागर घराण्याकडे पाहितलं जातं  त्या घरच्या तिसर्‍या पिढीने राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देण्यास सुरुवात केल्याचे प्रकर्षाने जाणवत असून काकु-नानांना आदर्श समजून राजकारण करणारे राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप क्षीरसागरसध्या शहरातल्या घराघरांमध्ये जावून संवाद साधत आहेत. अडीअडचणी विचारून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांच्या मुलभूत गरजांसाठी शासन-प्रशासन दरबारी आवाज उठवत आहेत. कधी पाण्यासाठी, कधी दूषित पाण्यासाठी, कधी बोगस रस्त्यासाठी तर कधी कचरा आणि डासांच्या प्रादुर्भावासाठी आवाज उठवून लोकांच्या आरोग्यासह अन्य घरजांकडे जातीने लक्ष देत असल्याने संदीप क्षीरसागरांच्या घराघरातील भेटींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच संदीप क्षीरसागर आपण उमेदवार असल्याचेही सांगत असल्याने ही घराघरातली भेट विधानसभेची जय्यत तयारी असल्याचेही जाणवले. 
    गेल्या तीन वर्षापूर्वी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्याशी बंड करून संदीप क्षीरसागरांनी नगरपालिकेसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. या दोन्ही निवडणुकीत संदीप क्षीरसागरांना बीड शहरासह ग्रामीण भागातील मतदारांनी स्वीकारले. संदीप क्षीरसागरांचे अनेक उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झाले. त्यानंतर महिनाभरापूर्वी जयदत्त क्षीरसागरांनी राष्ट्रवादीला अखेरचा रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला अन् इकडे संदीप क्षीरसागरांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला. राजकीयदृष्ट्या बीड जिल्हा प्रचंड संवेदनशील आहे. हे उघड सत्य संदीप क्षीरसागरांना चांगलच ठाऊक असल्याने राजकारणाबरोबर समाजकारणाला त्यांनी अधिक महत्त्व देण्याचे ठरवले आणि त्यानुसार गेल्या तीन-चार महिन्यांपासून संदीप क्षीरसागरांनी शहरातील जनतेच्या विविध प्रश्‍नांवर आवाज उठवायला सुरुवात केली. कधी पाणी टंचाईचा विषय घेऊन मोर्चे काढले तर कधी दूषित पाण्यावरून अधिकार्‍यांना भेट देऊन घराघरात जाऊन दूषित पाण्याच्या बाटल्या देत बीड नगरपालिकेची पोलखोल केली. कधी रस्त्याच्या कामावर जावून बोगस कामासंदर्भात ‘हा सूर्य आणि हा जयद्रत’ सोशल मीडियावरून लोकांना लाईव्ह दाखवला. गेल्या दोन-तीन दशकात एखादा इच्छूक उमेदवार लोकांच्या मुलभूत गरजांसाठी शासन-प्रशासन व्यवस्थेशी भांडतो, असे कधी दिसून आले नाही. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने संदीप क्षीरसागरांना शब्द दिल्यानंतर होय, आपणच विधानसभेचे उमेदवार आहोत, असे छातीठोकपणे सांगत घराघरात जावून  संदीप क्षीरसागर सध्या संवाद साधत आहेत. त्यांच्या या घराघरातील भेटीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून तरुण वर्गासह अबालवृद्धही त्यांना साद घालत आहेत. लोकांच्या प्रश्‍नावर घरोघरी जावून याआधी कुठल्याही उमेदवाराने एवढा पायपिटा केल्याचे ऐकविण्यात नाही. मात्र संदीप क्षीरसागर हे शहरातल्या प्रत्येक घरात जावून नगरपालिकेची पोलखोल तर करतच आहेत, लोकांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणार्‍या सत्ताधार्‍यांचेही वाभाडे काढत आहेत. त्यांचा हा घरोघरी जावून भेटीचा कार्यक्रम लोकांना भावला असून अनेक जण आपल्या अडीअडचणी सांगत आहेत. विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. बीड विधानसभा मतदारसंघात चौरंगी-पंचरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येणार्‍या काळात ही लढत कशी असेल हे दिसूनच येईल परंतु या लढतीसाठी संदीप क्षीरसागरांनी घरोघरी भेटी देऊन मोठी मतदानरुपी रसद जमा केली अन् लोकही त्यांच्या या मोहिमेत उत्स्फूर्त सहभागी होत आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. 

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review