विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश
नियुक्ती रद्द झालेल्या ८३२ सहाय्यक ठढज विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; नौक-याचा मार्ग मोकळा
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कायम झटणार - धनंजय मुंडे
मुंबई (रिपोर्टर)- सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द झालेल्या ८३२ विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला आहे. उच्च न्यायालयाने या नियुक्त्‌यांना स्थगिती दिली होती . मात्र सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त्‌या योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कायम झटणार असे आश्वासनही दिले आहे. 
धनंजय मुंडे म्हणाले की, या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला त्याचे फळ मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला याचे समाधान वाटतंय असे ते म्हणालेत. खरंतर गेल्या दीड वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. विरोधी पक्षनेते मुंडे सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडले तेव्हाही मुंडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती तसेच विधान परिषदेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना जाब विचारला होता. लोकमत समूहाच्या रायझिंग महाराष्ट्र या कार्यक्रमातही दिवाकर रावते चर्चेला बसले असता या ८३२ विद्यार्थ्यांना भवितव्याबाबत मुंडे यांनी मंत्री दिवाकर रावते यांना धारेवर धरले होते. आज दिड वर्षींनी विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने धनंजय मुंडे हा विरोधी पक्षाचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review