ताज्या बातम्या

खासगी कंपन्यांचे परळीत फोन सर्व्हे सात टक्क्यांनी धनंजय मुंडे आघाडीवर

खासगी कंपन्यांचे परळीत फोन सर्व्हे
सात टक्क्यांनी धनंजय मुंडे आघाडीवर; फोन सर्व्हेची परळीत जोरदार चर्चा
परळी (रिपोर्टर):- विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने खासगी कंपन्यांकडून परळीत सर्व्हे केला जात असून एकाच वेळी शेकडो जणांचे फोन खणखणतात आणि तिकडून मंजूळ स्वरात आपलं मत कोणाला धनंजय मुंडे असतील तर १ दाबा, पंकजा मुंडेंना असेल तर २ दाबा असा आवाज येतो आणि लोक बटन दाबतात. या सर्व्हेमध्ये धनंजय मुंडे सात टक्क्यांनी आघाडीवर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत असून या सर्व्हेची जोरदार चर्चा सध्या परळीत होतांना दिसून येत आहे. 
राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशिल असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेमधील भाऊ-बहिणीची लढत अवघा महाराष्ट्र पहाणार आहे. याठिकाणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे समोरासमोर लढणार असल्याने राज्याचे लक्ष या लढतीकडे आहे. म्हणूनच खासगी कंपन्यांकडून परळी मतदार संघात सर्व्हे केला जातोय. कालपासून अचानक एकाच वेळी शेकडो जणांचे फोन, मोबाईल खणखणतात आणि समोरून आपलं मत कोणाला धनंजय मुंडेंसाठी असेल तर १ दाबा पंकजा मुंडेंसाठी असेल तर २ दाबा त्यावेळी फोन धारक आपलं मत देवून टाकतो. या फोन सर्व्हेची परळी शहरात जोरदार चर्चा असून जो तो एकमेकांना तुम्हाला फोन आला होता का? तुम्ही कोणाला मतदान दिलं असं म्हणत चर्चा करत आहेत. या फोन सर्व्हेमध्ये झालेल्या मतदानात सात टक्क्यांनी धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review