ताज्या बातम्या

राष्ट्रवादीने गेवराई, बीडमधून दिली नवीन चेहर्‍याला संधी 

राष्ट्रवादीने गेवराई, बीडमधून दिली नवीन चेहर्‍याला संधी 
मजीद शेख
---
बीड - विधानसभा निवडणुकीचे मैदान तापत असून प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार अद्याप जाहीर केले नसले तरी खा. शरद पवार यांनी बीडच्या दौर्‍यात जिल्हयातील आपले उमेदवार जाहीर करुन कामाला लागण्याचे आदेश दिले. पाच मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये बीड आणि गेवराईत नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली. गत विधानसभेच्या निवडणुकीत बीडमधून जयदत्त क्षीरसागर हे उमेदवार होते. त्यांचा सहा हजार मतांनी विजय झाला होता. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देवून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बीडमधून मंत्री क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली. गेवराईतून बदामराव हे ही शिवसेनेत गेले. त्यामुळे विजयसिंह पंडीत यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली. अन्य मतदार संघात गत वेळी जे उमेदवार होते. त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. या निवडणुकीत काय होतयं याकडे लक्ष लागून आहे. 
विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापत आहेत. सगळ्याच पक्षाचे नेते निवडणुकीच्या कामाला लागले. राज्यभरात काही नेते दौरे करुन सभा, मेळावे घेत आहेत. १७ सप्टेंबर रोजी खा. शरद पवार  बीड जिल्हयाच्या दौर्‍यावर आले होते. पवार बीडला मुक्कामी होते. १८ सप्टेंबरला त्यांची बीड शहरात जाहीर सभा झाली. यामध्ये त्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करुन कामाला लागण्याचे आदेश दिले. पवारांनी पहिली यादी बीडमधून जाहीर केली. सहा मतदार संघातील पाच उमेदवार घोषीत करण्यात आले. परळीतून धनंजय मुंडे, बीड मधून संदीप क्षीरसागर, गेवराईतून विजयसिंह पंडीत, माजलगावमधून प्रकाश सोळंके, केज मधून नमिता मुंदडा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या पाच उमेदवारापैकी दोन उमेदवार नवीन चेहरे आहेत. बीड मधून गत विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर जयदत्त क्षीरसागर हे निवडून आले होते, मात्र जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत गेल्याने बीडमधून त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली. गेवराईतून गत वेळी बदामराव पंडीत हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला होता. बदामराव हे ही शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडीत यांना उमेदवारी देण्यात आली. विजयसिंह आणि संदीप या दोन  नवीन चेहर्‍यांना  पवारांनी उमेदवारी दिली.. बाकीचे तीन उमेदवार यांनी गत विधानसभा निवडणुक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. यावेळी मोठ्या जोमाने जिल्हयातील राष्ट्रवादी कामाला लागली आहे. इतर पक्षाचे अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाही. बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, या निवडणुकीत काय होतयं याकडे लक्ष लागून आहे. 
---
आष्टीचा उमेदवार जाहीर केला नाही 
गत विधानसभेत आष्टीतून राष्ट्रवादीच्या तिकीटावर सुरेश धस निवडणुक लढले होते. मात्र त्यांचा अवघ्या सहा हजार मतांनी पराभव झाला होता. धस यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्याने आष्टीत राष्ट्रवादीची ताकद कमी झाली. राष्ट्रवादीकडून आपणास तिकीट द्यावे म्हणुन बाळासाहेब आजबे आणि सतिष शिंदे यांनी मागणी केलेली आहे. या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षापुढे प्रश्‍न आहे. त्यातच कॉंग्रेस पक्षाला एक ही जागा जिल्हयात नाही. आष्टीचा मतदार संघ कॉंग्रेसला सुटतो की काय असा प्रश्‍न निर्माण झाला? केज व परळी हे मतदार संघ कॉंग्रेसला सोडावे अशी मागणी कॉग्रंेस नेते करत होते मात्र केज, परळीतून राष्ट्रवादीचे उमेदवार घोषीत झालेले आहेत. आष्टीचा उमेदवार घोषीत झालेला नाही,आष्टीत नेमकं काय होतय? याकडे लक्ष लागून आहे. 
---
गत विधानसभेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेली मते 
गेवराई- बदामराव पंडीत- राष्ट्रवादी-  ७६३८३
माजलगाव- प्रकाश सोळंके- राष्ट्रवादी- ७५२५२
बीड- जयदत्त क्षीरसागर-राष्ट्रवादी- ७७१३४
आष्टी-सुरेश धस-राष्ट्रवादी- ११४९३३
केज - नमिता मुंदडा-राष्ट्रवादी- ६४११३
परळी- धनंजय मुंडे-  राष्ट्रवादी-७१००९

अधिक माहिती: beed

Best Reader's Review