ताज्या बातम्या

जुन्या भांडणाच्या कारणावरुन उपसरपंचाला बेदम मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरुन उपसरपंचाला बेदम मारहाण
बीड (रिपोर्टर):- जुन्या भांडणाचे कारण काढून बेलूरा येथील उपसरपंचाला सहा जणांनी बेदम मारहान केल्याची घटना आज सकाळी घडली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर घटनास्थळी बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय सुजित बडे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बीड तालुक्यातील बेलुरा येथील उपसरपंच पांडूरंग सुरेश गवते यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून बजरंग गवते, नमदेव गवते व इतर चार ते पाच जणांनी मिळून बेदम मारहान केल्याची घटना आज सकाळी घडली. त्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळताच घटनास्थळी एपीआय सुजीत बेड यांच्यासह भागवत शेलार यांनी धाव घेतली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review