कर्नाटक पोटनिवडणूक : कॉंग्रेस-जेडीएसचा जल्लोष, भाजपाला फटका 


बंगळुरू (वृत्तसेवा):-कर्नाटकात झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडीला मोठं यश मिळालं आहे. भाजपाची या निवडणुकीत पिछेहाट झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे. बल्लारी लोकसभा मतदारसंघ आणि जामखांडी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मांडया लोकसभा आणि रामानागारा विधानसभा मतदारसंघातून जेडीएस उमेदवाराने विजय मिळवला आहे.
कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. शनिवारी इथे मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत पाच मतदारसंघात ६७ टक्के मतदान झाले होते. ही पोटनिवडणूक कॉंग्रेस आणि जेडीएस आघाडीची एक परीक्षा होती. पाच महिन्यांपूर्वीच ही आघाडी अस्तित्वात आली आहे. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना या पोटनिवडणुकीचे निकाल तिन्ही पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहेत. रामानगरम विधानसभा मतदारसंघातून जे़डीएस उमेदवार अनिता कुमारस्वामी १ लाख ९ हजार १३७ मतांनी विजयी झाल्या आहेत. अनित कुमारस्वामी यांना १ लाख २५ हजार ४३ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवाराला फक्त १५ हजार ९०६ मते मिळाली. अनिता मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत.

अधिक माहिती: mumbai

Best Reader's Review