गढीच्या पुलावर अपघात पिता ठार, मुलगा जखमी

eReporter Web Team

गेवराई रिपोर्टर गावाकडे मोटरसायकलवर जात असतांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने यात पिता गंभीररित्या जखमी होवून ठार झाला तर जखमी अवस्थेत असलेल्या मुलास रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रात्रीच्या दरम्यान गढीच्या पुलावर घडली. 
रामराव आलु राठोड रा.आंबुनाईक तांडा हे आपल्या मुलासमवेत मोटर सायकलवर रात्रीच्या दरम्यान गावाकडे जात होते. गढीच्या पुलावर त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात रामराव राठोड हे गंभीररित्या जखमी होवून ठार झाले तर त्यांच्या मुलास उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like