"त्या"मयताचा अहवाल निगेटिव्ह सात पैकी एक पॉझिटिव्ह

eReporter Web Team

पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा आष्टी तालुक्यातील धनगर वाडीचा
बीड- ऑनलाईन रिपोर्टर 
काल संशयित म्हणून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा  मध्यरात्री मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली त्या तरुणाचा स्वॅब लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता या अहवालाकडे जिल्हाचे लक्ष लागून असतानाच त्या मायाताचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकिसक डॉ अशोक थोरात यांनी दिली  असून त्या सात पैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाच्या कोरोनाबाधितांमध्ये आणखी एक रुग्ण वाढला आहे तर अन्य सहा संशयितांचे अहवाल निष्कर्षा विना आले  आज पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा आष्टी तालुक्यातील धनगर वाडीचा असून तो मुबई येथून आलेला आहे 
   गेल्या आठवडाभरापासून बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, वडवणी, माजलगाव, धारूर तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. काल एकाच दिवशी १३ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली. तर दुसरीकडे काल सायंकाळच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील १९ वर्षीय तरुण तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आला होता. त्या तरुणाचा स्वॅब घेण्यात आला मात्र रात्री १२ वा. ५ मिनिटांनी अचानक सदरच्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्याचे स्वॅब कोरोना तपासणी साठी पाठवण्यात आले होते आता रात्री ११ च्या दरम्यान सदरील मायाताचया स्वॅब चा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. अशोक थोरात यांनी दिली 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like