धारूरच्या घाटात ट्रक पलटला

eReporter Web Team

चालकासह क्लिनर जखमी
धारूर रिपोर्टर हैद्राबादहून बीडकडे सिमेंट घेवून येणारा ट्रक धारूरच्या घाटात पलटी झाल्याने यामध्ये चालक व क्लिनर जखमी झाले. सदरील ही घटना आज सकाळी घडली. या ट्रकमध्ये जवळपास ६०० पोते सिमेंट होते.
आज सकाळी धारूर घाटात बीडकडे ६०० पोते घेवून ट्रक येत असताना ब्रेक निकामी झाल्याने सदरील ट्रक पलटी झाला. यामध्ये चालक व क्लिनर दोघेजण जखमी झाले. दरम्यान ज्यावेळी ट्रक पलटी झाला त्यावेळी समोरून स्कॉर्पिओ येत होती. सुदैवाने स्कॉर्पिओमधील प्रवाशी बालंबाल बचावले. या घाटामध्ये नेहमीच अपघाताची घटना घडत आहे. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: beed

Related Posts you may like