पाटोदा तालुक्यातील धनगरवाडी पिंपळा  सह परिसर कन्टेनमेंट झोनमध्ये

eReporter Web Team

बीड रिपोर्टर आष्टी तालूक्यातील धनगरवाडी (पिंपळा) येथे कोरोना विषाणूचे लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत 
   याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे आष्टी तालूक्यातील धनगरवाडी (पिंपळा) या गावापासून ३ कि.मी. परिसरातील धनगरवाडी (पिंपळा), पिंपळा, काकडवाडी, नांदूर, खरडगव्हाण, सोलापूरवाडी हा परिसर कन्टेनमेंट झोन (उेपींरळपाशपीं ूेपश) म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: beed

Related Posts you may like