हिंगणी तलावातून सर्रासपणे पाणी उपसा तहसिल प्रशासनाचाही या कडे कानाडोळा

eReporter Web Team

तेलगाव पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे

  किल्ले धारूर (रिपोर्टर)- तेलगाव येथील पाटबंधारे विभागाच्या संबंधित
अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हिंगणी येथील सस्वती साठवण  तलावातुन
सर्रासपणे शंभर ते दिडशे विद्युत पंपाने शेतीसाठी पाणी उपसा करण्यात येत
आहे. हा तलाव मृत साठ्यात असुन, सध्या जे पाणी आहे पिण्यासाठी व
जनावरांसाठी आरक्षित करण्याची अवश्यकता असतानाही पाटबंधारे विभागाचे
अधिकारी, कर्मचारी याकडे सफाईदारपणे दुर्लक्ष करत आहेत. तरी होणारा पाणी
उपसा तात्काळ बंद करावा. अशी मागणी  होत असतांनाही तहसिल प्रशासन लक्ष
देत नाही .
     धारूर तालुक्यातील हिंगणी येथे सरस्वती साठवण तलाव आहे, या तलावात
सध्या मृत साठ्यापेक्षा कमी पाणी आहे. त्यातच आता कडक उन्हाळा जाणवत
असल्याने वाढत्या उन्हाळ्यासोबतच नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तसेच या परिसरात असलेल्या विहिरी व
बोअरची पाणी पातळी खोल जात असल्याने या तलावात पाणी जिल्हाधिकारी यांनी
तलावातील होणार्‍या पाणी उपस्यावर बंदी घातली आहे . तलावातील पाणी
आरक्षित करण्याची अवश्यकता असतांना सध्या सर्रास उपसा सुरू आहे .तशी
नागरिकांची मागणी आहे. असे असताना पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकारी
व कर्मचारी यांच्या दुर्लक्ष व आशिर्वादाने सर्रासपणे शेतीसाठी पाणी उपसा
करण्यात येत आहे . मृत साठ्यापेक्षा कमी पाणी असतानाही सर्रासपणे व
मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने येत्या काही दिवसातच या तलावात
थेंबभरही पाणी राहणार नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसह जनावरांना
पिण्याच्या भिषण पाणी  टंचाईचा मुकाबला करावा आहे. तसेच परिसरातील विहीरी
व बोअरची पाणी पातळी खालवाणार आहे. त्यामुळे तात्काळ हा पाणी उपसा बंद
करण्याचीच गरज आहे.  तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी याची गंभीरतेने दखल
घेऊन हिंगणी तलावातुन सर्रासपणे होणारा पाणी उपसा  तात्काळ बंद करण्याचे
आदेश पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी  यांना द्यावेत.
यावरही पाणी उपसा चालुच राहिला चालुच राहीला तर पाटबंधारे विभागाच्या
संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक व दंडात्मक कारवाई करावी. आशी
मागणी या परिसरातील नागरीक करित आहे

 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like