बीड, माजलगावात दारू खरेदी करण्यासाठी तळीरामांनी लावल्या रांगा

eReporter Web Team


बीड/माजलगाव (रिपोर्टर)- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या साठ
दिवसांपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. आजपासून जिल्ह्यात 11 तासाचंी
शिथिलता देण्यात आली. यात दारूच्या दुकानांना परवानगी दिल्याने
सकाळपासूनच तळीराम दारूच्या दुकानांसमोर ठाण मांडून होते. सोशल
डिस्टन्सचे पालन करत आणि माजलगावच्या दुकानांसमोर मद्यपींच्या रांगा
दिसून आल्या. अगदी पोलिस बंदोबस्तामध्ये दारूची विक्री सुरू होती.
  जिल्हाधिकारी रेखावर यांनी जिल्ह्यात वाईन विक्री करणार्‍या वाईन शॉप
चालकांना नियमाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या
आदेशाचे पालन करत दुकानांसमोर जास्त गर्दी होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्स
ठेवून पोलीस बंदोबस्तात वाईन विक्री करत आहेत. वाईन घेत असताना कोणी पाहू
नये यासाठी काही तळीरामांनी चेहरा झाकून वाईनची खरेदी केली. गेल्या दोन
महिन्यांपासून बीड जिल्ह्यात कडेकोट संचारबंदी होती. या कार्यकाळात
कोठेही दारूचे दुकान सुरू नव्हती. त्यामुळे मद्यपींची चांगलीच तगमग झाली
होती. आजपासून वाईन विक्रीस परवानगी दिल्याने सकाळपासूनच मद्यपींनी
माजलगाव आणि बीड शहरातील वाईनच्या दुकानांमोर रांगा लावल्या. नियमाचे
पालन व्हावे यासाठी वाईन चालकांनी अंतरावर मार्कींग केली. त्याचबरोबर
जास्तीची गर्दी उसळू नये यासाठी बॅरिगेडही लावले होते.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like