कवडगाव थडीसह परिसरातील कंटेन्मेंट, बफर झोन काढला

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर):- माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने या गावासह परिसरातील गावे बफर आणि कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केली होती. मात्र तेथील रूग्ण बरा झाला असून त्याला १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. शिवाय या परिसरात एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला नसल्याने येथील कंटेन्मेंट झोन, बफर झोनचे आदेश काढत परिस्थिती पुर्ववत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. 
माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने कवडगाव थडीसह रिधोरी, भगवाननगर, गव्हाण थडी, रामनगर, सुर्डी, शेलगाव थडी हा परिसर कंटेन्मेंट झोन तर वारोळा, टाकरवण, राजेगाव, गेवराई तालुक्यातील तपे निमगाव हा परिसर बफर झोन म्हणून अनिश्‍चित काळासाठी बंद केला होता. मात्र तेथील रूग्ण बरा झाला असून बंद केलेला कालावधी १४ दिवसाचा पुर्ण झाल्यानंतर तेथे एकही रूग्ण आढळून आला नाही. आज दि.१ जुन पासून तेथील कंटेन्मेंट, बफर झोन काढुन परिस्थिती पुर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 
आज पाठवले ९ स्वॅब
परवा आणि काल पाठवलेल्या ७६ स्वॅबपैकी एक पॉझिटिव्ह तर दोन स्वॅबचे निष्कर्ष आलेले नाहीत. आज नव्याने ९ स्वॅबचे नमुने पाठविले आहेत. त्याचा रिपोर्ट रात्री येणार आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like