जिल्ह्यात वादळी वार्‍यासह मान्सून पावसाला सुरुवात 

eReporter Web Team

अनेक ठिकाणी झाडे उन्मळली ,वीज पुरवठा खंडित, शेतकरी सुखावला, शेती कामांना वेग 
बीड (रिपोर्टर)- वादळीवार्‍यासह रविवारी रात्री बीड जिल्हात मान्सून पावसाने हजारी लावत लॉकडाऊन मध्ये सर्वानाच सुखद धक्का दिला .काही भागात सायंकाळी सहा तर काही भागात रात्री आठ वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस मध्यरात्री उशिरा पर्यंत कोसळत होता काही भागात पावसाची रिपरिप सुरु होती सोसाट्याच्या वार्‍यामुळे बीड ,अंबाजोगाई ,वडवणी तालुक्यात झाडे उन्मळून पडले त्या मुळे अनेक भागातला वीज पुरवठा १२ तासापेक्ष्या जास्त काळ खंडित राहिला असला तरी मान्सून वेळेवर आल्याचा आनंद शेतकर्‍यात पाहायला मिळाला असून शेती कामांना वेग आल्याचे चित्र जिल्हात होते रात्री जिल्हात १७.१२मी.मी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस हा परळी महसूल मंडळात ४५ मी.मी येवडा मोजला गेला 
   बीड जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अन रात्री उशिरा सर्वत्र मान्सून पावसाने हजेरी लावली जिल्ह्यात सरासरी १७.१२ मी मी पावसाची नोंद झाली आहे,बीड, वडवणी, पाटोदा, आष्टी , केज, अंबाजोगाई, माजलगाव तालुक्यात पावसाने जोर दाखवला. विजेचा कडकडाट अन वादळी वार्‍यासह पावसाने उन्हाची तीव्रता कमी केली, कालच्या वादळी वार्‍या मूळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडली , विद्युत तारा तुटल्या अंबाजोगाई, वडवणी येथील वीज पुरवठा खंडित झाला, वातावरणात मोठा उकाडा निर्माण झाला आहे, गेल्या काही वर्षात दुष्काळाचा सामना करणार्‍या बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस पडल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी समाधानी दिसत असून शेतीच्या कामासाठी शेतकर्‍याची लगबग सुरू झाली आहे.
कोठे किती पावसाची नोंद 
बीड  १९मि.मी. , नवगण राजुरी १४मि.मी , पेंडगाव -२५मि.मी , मांजरसुंबा -१३ मि.मी, चौसाळा -७मि.मी , नेकनूर -९मि.मी , नाळवंडी -५मि.मी , पिंपळनेर -३मि.मी , पाली -२९मि.मी , म्हाळसजवळा -१८मि.मी , लिंबागणेश -७मि.मी पाटोदा -२०मि.मी , थेरला ८ मि.मी, अमळनेर -१० मि.मी, दासखेड -२१मि.मी , आष्टी -३६ मि.मी, कडा -१९ मि.मी, धामणगाव -४० मि.मी. दौलावडगाव -१८मि.मी , पिंपळा -१९मि.मी , टाकळसिंग २१ मि.मी , धानोरा -२२मि.मी , गेवराई -८.१मि.मी धोंडराई -४मि.मी , उमापूर -७मि.मी, चकलांबा -११मि.मी , मादळमोही ४ मि.मी, पाचेगाव -७मि.मी , जातेगाव -०मि.मी , तलवाडा -२मि.मी , रेवकी -२०मि.मी , सिरसदेवी -१७मि.मी , शिरूर कासार - ७मि.मी.रायमोह ५मि.मी , तितरवणी -५ मि.मीमि.मी, वडवणी २० कौडगाव बु ३९मि.मी , अंबाजोगाई २२मि.मी , घाटनांदूर १४मि.मी , लो सावरगाव ९ मि.मी, बर्दापूर १४मि.मी, ममदापूर २२मि.मी , माजलगाव १५मि.मी, , गंगामसला ३५ मि.मी,दिदुड ६०मि.मी, नित्रुड तालखेड -४१मि.मी कि आडगाव १०मि.मी केज . २८मि.मी . विडा १२मि.मी युसुफवडगाव -६मि.मी , हनुमंत पिंपरी -२०मि.मी होळ -४मि.मी, बनसारोळा ६मि.मी नांदूरघाट नांदूर  १६मि.मी .

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like