मन्यारवाडीच्या शिवारात स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडले

eReporter Web Team

गेवराई (रिपोर्टर):- मन्यारवाडी शिवारामध्ये आज सकाळी स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडले. याची माहिती सरपंच यांना झाल्यानंतर सरपंचासह अन्य लोकांनी घटनास्थळी धाव घेवून या अर्भकास उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. सदरील हे अर्भक कोणी फेकून दिले असावे याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.
मन्यारवाडी शिवारात शेतामध्ये लहान मुलाच्या रडण्याचा आवाज त्या भागातील महिलेस आल्यानंतर सदरील महिलेने घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी जीवंत मुलगी आढळून आली. त्या महिलेने सरपंच शिवाजी लक्ष्मण घाडगे यांना माहिती दिली. सरपंच घाडगे, प्रकाश अंकुश घाडगे, अंगणवाडी शिक्षीका जनाबाई काळे या सर्वांनी मिळून या मुलीस उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. युवराज टाकसाळ यांनी घटनास्थळी  येवून पंचनामा केला. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like