
शैक्षणीक वर्षे सुरू, शाळा बंद, ऑनलाईन सुरू....
बीड (रिपोर्टर)ः- आजपासून राज्यासह जिल्ह्यात शैक्षणीक वर्षे सुरू झाले
असले तरी जोपर्यंत राज्य शासनाच्या सुचना येत नाही तो पर्यंत जिल्हा
परिषद प्राथमीक, संस्थेच्या कोणत्याही शाळा सुरू करावयाच्या नाहीत. बीड
जिल्ह्यामध्ये एक ते आठ वर्गासाठी माझी शाळा, हे अॅप जिल्हा परिषद
शिक्षण विभागाने विकसीत केले असून या अॅपद्वारे विद्यार्थ्यांनी शिक्षण
घ्यायावयाचे आहे. तर माध्यमीक विभागात फक्त दहावीचे ऑनलाईन वर्ग सुरू
झालेले आहेत अशी माहिती बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमीक आणि माध्यमीक
शिक्षणाधिकार्यांनी दिलेली आहे.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आजपासून शैक्षणीक वर्षे सुरू झाले असले
तरी राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. बीड जिल्हा
परिषदेने माझी शाळा हे अॅप सुरू केले असून या अॅपमध्ये बीड
जिल्ह्यामधून 25 तज्ञ शिक्षण घेवून सर्व वर्गाचा अभ्यासक्रम आणि पाठ तयार
करतात. तो या अॅपचे तत्र विषयक बाबी साभाळतात. त्या शिक्षकाला या 25
शिक्षकांने तयार केलेला पाठ पाठवून दिल्यानंतर हा तंत्रज्ञान माहिती
असलेला शिक्षक त्या अॅपवर या शिक्षकेने तयार केलेला पाठ डाऊनलोड करतो
आणि हा डाऊनलोड केलेला शैक्षणीक पाठ ज्यांना शक्य असेल त्या
विद्यार्थ्यांने शिकवून घ्यायावयाचा आहे. तर दुसर्या बाजूला इयत्ता
दहावीच्या वर्गासाठी आजपासून अत्यावश्यक दहावीचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले
आहे. आज या ऑनलाईन वर्गाचा पहिला दिवस असल्याने यामध्ये काही अडचण येतात,
कोणत्या विद्यार्थ्यांकडे अॅड्राईड मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांची काय
व्यवस्था करायची यासर्व बाबीवर जिल्हा परिषदेचे माध्यमीक अधिकारी राजेश
खटावकर, हे माहिती घेत आहे. आज या वर्गाचा पहिला दिवशी इयत्ता दहावीचा
260 विद्यार्थ्यांने सहभाग नोंदवला होता. बीड जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई,
ठाणे तसेच राज्यातील इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक स्थंलातर होवून
आलेले आहे. असे स्थलांतर होवून आलेले लोक आणि त्यांची मुले-मुली
शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणून त्याचा सर्वे करण्याचा काम आणि
प्रवेश देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या प्राथमीक विभागाकडून सुरू आहे.
मुलंाचा शाळेतील प्रवेश घेणे, एखादया विद्यार्थ्यांला शाळा बदलायची
असल्यास त्याचा दुसर्या शाळेत प्रवेश घ्यायावयाचा असल्यास ही सर्व कामे
ऑनलाईन करावयाची आहे. प्राथमीक आणि माध्यमीक शाळेत मोजका कर्मचारी विभाग
सोडता सर्व शिक्षकांना उपस्थित रहाणे असेही बंधनकारक नाही. असेही शिक्षण
विभागाने स्पष्ट केले आहे.
अधिक माहिती: beed