कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणार्‍या जिल्ह्यात आज पाच पॉझिटिव्ह

eReporter Web Team

कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणार्‍या जिल्ह्यात आज पाच पॉझिटिव्ह
बीड । रिपोर्टर
गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे मिटर थांबल्याने बीड जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु असतांना आज तब्बल 5 नवीन रुग्णांची भर पडल्याने कोरोनाचे मिटर पुन्हा सुरु झाले आहे. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये  बीड आणि आष्टी येथील रुग्ण आढळले आहेत.
आज बीड जिल्ह्यातून एकूण 37 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी  स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. 
त्यापैकी निगेटिव्ह अहवाल - 32, पॉजिटिव्ह अहवाल - 05 यामध्ये
आष्टी येथील (रा.सुर्डी ता. आष्टी, एक 59 व 31 वर्षे महिला, तर 32 वर्षे पुरूष (मुंबईहून आलेले आहेत) तर
बीड येथील -( रा.अजिजपुरा, बीड - 33 वर्षे पुरूष (औरंगाबादहून आलेला)
 दत्तनगर  समोरील गल्ली, बीड - 44 वर्षे पुरूष (पॉझिटिव्हशी संपर्क)

आज पाठवलेले अहवाल
1)    जिल्हा सामान्य रुग्णालय बीड      10
2) ग्रामीण रुग्णालय आष्टी 09

3) ग्रामीण रुग्णालय
                       माजलगाव 04
4)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय       आंबाजोगाई   14

       एकूण    बीड जिल्हा 37
आजपर्यंत जिल्ह्यात तब्बल 111 रुग्णांची नोंद होती त्यामध्ये आजचे नविन 5 असे एकून 116 असून  98 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यात आज धारूर येथील दोन तर बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातून 8 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने सध्या जिल्हा रुग्णालयात 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात आजचे 5 रुग्ण. आतापर्यंत जिल्ह्यात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like