एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या

eReporter Web Team


जिल्हाधिकार्‍यांचा दणका; बदली आदेशानंतर तीन दिवसात रुजू व्हा नसता सेवा समाप्त
बीड (रिपोर्टर) जिल्हा रोजगार हमी योजने अंतर्गत विविध शासकीय कार्यालयामध्ये प्रकल्प अधिकारी, तांत्रिक सहाय्यक ठाण मांडून बसलेले आहेत. याठिकाणी अनेक अधिकारी आणि कर्मचारी आपले हितसंबंध जोपासत वलय निर्माण केले होते. या सर्वांच्या काल जिल्हाधिकार्‍यांनी बदल्या केल्या असून त्यांना तात्काळ बदली झालेल्या ठिकाणातून इतर ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ३७ प्रकल्प अधिकारी, ७० तांत्रिक सहाय्यक आणि २२ संगणक चालकांचा समावेश आहे. या सर्वांच्या एकाचवेळी जिल्हाधिकार्‍यांनी बदल्या केल्यामुळे हितसंबंध उतलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांनी आपली राजकीय वसेलीबाजी लावत बदली रद्द करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्याच्या जिल्हा नरेगा कक्ष, पंचायत समित्या, तहसिल कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, वनीकरण विभाग याठिकाणी प्रकल्प अधिकारी, कंत्राटी अभियंते आणि संगणक परिचालक यांनी ठाण मांडले होते. राजकीय पदावरील व्यक्तींसोबत संगनमत करत अनेक सरपंच, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य यांना हाताशी धरत त्यांनाही माल कमवून देणे आणि स्वत:ही माल कमवणे अशा भुमिकेतून या सर्वांची कार्यपध्दती चालु होती. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निवडणूक कामाचा व्याप संपल्यानंतर लागलीच कोरोना या महाभयंकर आजारामुळे त्यांना आपला बराचसा वेळ कोरोना नियंत्रणासाठी घालावा लागला. गेल्या आठवड्यात थोडीशी उसंत मिळाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा रोजगार हमी योजनेकडे वळवला. याठिकाणी गेल्या दहा वर्षापासून अनेक सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कंत्राटी अभियंते आणि संगणक परिचालक ठाण मांडून बसले होते. अशा सर्वांच्या बदल्या या तालुक्यातून त्या तालुक्यात आणि एका कार्यालयातून दुसर्‍या कार्यालयात केलेल्या आहेत. त्यामुळे ३७ प्रकल्प अधिकारी, ७० कंत्राटी अभियंते, २२ संगणक चालक यांना बदली झाल्याच्या आदेशापासून तीन दिवसाच्या आत बदलीच्या ठिकाणी पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जर तीन दिवसात बदली कर्मचार्‍यांनी आपला पदभार स्विकारला नाही तर त्यांची कंत्राटी सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल असेही बदली आदेशात रेखावार यांनी म्हटले आहे.
----


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like