गेवराईत जुगार आड्यावर छापा 96 हजाराचा मुद्देमाल जप्त

eReporter Web Team

 

गेवराई (रिपोर्टर) येथील गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेळला जाणार्‍या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 96,320 रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना शनिवार दि.11 रोजी रात्री अकराच्या सुमारास शहरातील साठेनगर येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस दल कोरोना बंदोबस्तात व्यस्त असल्याने अवैध धंद्यावाल्यांनी डोके वर काढले असून साठे नगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या पथकाने गेवराई शहरातील साठे नगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये शनिवार दि.4 रोजी रात्री 11.00 वा. छापा टाकून तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना 7 व्यक्तींना पकडुन या कारवाईत जुगाराचे साहित्य व मोबाईल मिळून एकुण 96,320/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील आरोपीवर पोलीस ठाणे गेवराई येथे गुरनं.308/2020 क.4, 5, 12(A) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा व क.188,269,270 भादवि सह क.51(ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार पोलिस हवालदार श्रीनिवास बोईनवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि संदीप काळे करत आहेत.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like