बेलगाव तांडा येथील  नागरिकांनी स्वखर्चाने बनवला रस्ता 

eReporter Web Team

रस्त्यासाठी अनेक वेळा मागणी केली मात्र रस्ता झाला नाही
बीड (रिपोर्टर)- ग्रामीण भागामध्ये आजही अनेक गावांच्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थीत रस्ते नाहीत, त्यामुळे नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बेलगाव तांडा येथे रस्ता नसल्याने रस्त्यासाठी येथील नागरिकांनी सातत्याने मागणी केली. जवळपास १५ वर्षे मागणी करूनही रस्ता होत नसल्याने स्वत: वर्गणी गोला करून रस्त्यावर मुरुम टाकून गावकर्‍यांनी रस्ता करून घेतला आहे. 
   बेलगाव तांडा या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थीत रस्ता नसल्याने रस्ता करण्यात यावा, अशी मागणी तांड्यावरील नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे सातत्याने केली. प्रशासकीय दरबारीही रस्त्यासाठी वेळोवेळी विनंती केली. शासन-प्रशासन गेल्या पंधरा वर्षांपासून नागरिकांना फक्त झुलवत ठेवत असे. सध्या पावसाळा असल्यामुळे या पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत गावकर्‍यांनी वर्गणी करून चारशे मिटर लांबीचा रस्ता तयार केला. त्यावर पक्का मुरुम टाकून रस्ता व्यवस्थीत केला आहे. गावकर्‍यांनी स्वखर्चाने रस्ता केल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना आता जाण्या-येण्यास अडचणी येणार नाहीत. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like