जिल्ह्यात मकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन मार्केट फेडरेशनचे वाजपेयी म्हणतात, मका नाही

eReporter Web Team

खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकर्‍यांची मागणी 
बीड (रिपोर्टर)-बीड जिल्ह्यात मका उत्पादक शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये एकही मका खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत असून प्रशासनाने आदेश देऊनही मार्केटिंग फेडरेशन अधिकारी वाजपेयी हे मका खरेदी केंद्र सुरू करत नाहीत. उलट शेतकर्‍यांना ते बीडमध्ये मकाचे उत्पादक होत नसल्याचे सागंतात. तूर खरेदीचे अनेक जणांना अद्याप पेमेंटही झाले नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. 
   बीड जिल्ह्यातील मार्केट फेडरेशनचे अधिकारी वाजपेयी हे मनमानीपणा करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकर्‍यांकडून येत असून बीड जिल्ह्यामध्ये मका उत्पादक शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे मात्र आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकही खरेदी केंद्र नाही. ही बाब माजी मंत्री सुरेश नवले यांनी जिल्हा उपनिबंधक यांना पत्राद्वारे कळविली. त्यानुसार संबंधितांनी मार्केट फेडरेशनला सूचनाही दिल्या. काही शेतकर्‍यांनी मका खरेदी केंद्र सुरू व्हावे यासाठी निवेदनही दिले मात्र मात्र मार्केट फेडरेशनचे अधिकारी वाजपेयी हे मनमानीपणा करत बीड जिल्ह्यात मकाचे उत्पादन होत नसल्याचे सांगून शेतकर्‍यांची अडवणूक करत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे शेतकर्‍यांची अडवणूक होत असून शेतकर्‍यांच्या मकाला शासकीय भाव मिळावा यासाठी मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like