शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळालेच पाहिजे म्हणत आ. धसांचे तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर संबुळ आंदोलन

eReporter Web Team

शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळालेच पाहिजे म्हणत
आ. धसांचे तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर संबुळ आंदोलन

आष्टी (रिपोर्टर)- शेतकर्‍यांना पिक कर्ज मिळालच पाहिजे, अशा घोषणा देत
भाजपा नेते तथा आमदार सुरेश धस यांनी आज सकाळी बैलगाडीतून एसबीआय बँकेत
जात घोषणाबाजी करत संबुळवादन आंदोलन केले. या वेळी शेतकरी उपस्थित होते.
राष्ट्रीयकृत बँका शेतकर्‍यांची थट्टा करत असल्याचा आरोप करत बँक अधिकारी
शेतकर्‍यांची हेळसांड करत असल्याच्या निषेधार्थ सुरेश धसांचे हे संबुळ
आंदोलन आज पार पडले.
   याबबत अधिक असे की, गेल्या दोन दिवसांपूर्वी आ. सुरेश धस यांनी
पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीयकृत बँकांना शेतकर्‍यांना कर्ज देण्याची
मानसिकता नाही, त्यामुळे ज्या बँकांनी पीक कर्जाचे अर्ज स्वीकारलेले आहे
परंतु शेतकर्‍यांना कर्ज दिले नाही, अशा सर्व बँकांसमोर संबुळ आंदोलन
करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज आ. सुरेश धसांनी आष्टी येथील
एसबीआयच्या बँकेसमोर जाऊन आंदोलन केले. बैलगाडीतून संबुळ वाजवत सुरेश
धसांचा काफिला बँकेवर जावून धडकला. दुधाला 10 रुपयांप्रमाणे अनुदान
मिळाले पाहिजे, अतिव्रष्टीत फळबागा वाल्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई
तात्काळ द्या, राजगृहावर तोडफोड करणार्‍या माथेफिरूवर कडक कारवाई करा,
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मंजूर झालेले कर्ज प्रकरण तात्काळ वाटप
करा, यासह आदी मागण्यांसाठी सुरेश धसांनी बँकेसमोर संबुळ आंदोलन केले.
शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळालेच पाहिजे या घोषणांनी धसांनी परिसर दणाणून
सोडलं. आष्टी, कडा कृषी कार्यालय, जळगाव, दौलावडगाव, धामनगाव, पिंपळा आदी
ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांसमोर संबुळ आंदोलन झाले.


अधिक माहिती: suresh dhas

Related Posts you may like