प्रलंबीत अहवालात परळीचे चौघे बाधीत

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या कोरोना संशयितांच्या
अहवालातील प्रलंबीत असलेल्यांपैकी 305 संशयितांचा अहवाल आज सोमवारी सकाळी
आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून यामध्ये 4 जण कोरोनाबाधीत आढळले
आहेत. तर एका संशयिताचा रिपोर्ट अनिर्णित ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर
कालचे 128 जणांचे रिपोर्ट प्रलंबीत असल्याचे सांगण्यात येते. वरील चौघेही
परळी शहरातील रहिवासी आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. रोज 500
पेक्षा अधिक जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येतात. प्रलंबीत
अहवालांपैकी 305 जणांचे अहवाल आज सोमवार रोजी सकाळी आरोग्य प्रशासनाला
प्राप्त झाले. यामध्ये 300 जण निगेटिव्ह आढळले तर चार जण कोरोनाबाधीत
आढळले. एक जणाचा अहवाल अनिर्णीत ठेवण्यात आला आहे. बाधीतांमध्ये 30
वर्षीय महिला (सिद्धार्थ नगर, परळी) ही पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात
होती तर याच भागातील 15 वर्षीय मुलाचा यात समावेश आहे. परळी तालुक्यातील
नंदागौळ येथील 40 वर्षीय इसम हा एसबीआय बँकेचा ग्राहक असून पेठ मोहल्ला
भागात राहणारी 35 वर्षीय महिला ही एसबीआय बँकेची ग्राहक आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like