फत्तेवडगावात जमावाकडून एकाची हत्या

eReporter Web Team


आष्टी (रिपोर्टर)-चोरीच्या उद्देशाने तालुक्यातील फत्तेवडगांवमध्ये तीन
चार जण आले असता,त्यातील एक जण लोकांच्या हाती लागल्याने लोकांनी त्याला
जबर मारहान केल्याने त्याचा जागीच मृृृृत्यू झाला आहे.हमजा नारायण भोसले
(वय 64)असे मृृृृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून,घटनास्थळी पोलिस अधिक्षक
हर्ष पोद्दार,अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांनी भेट दिली आहे.
  याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,आज पहाटे दि.13
रोजी तीन च्या सुमारास तीन ते चार जण चोरी करण्याच्या उद्देशाने
तालुक्यातील फत्तेवडगांव गावात आले होते.दरम्यान गावकरी गस्त घालत
असल्याने एकाने गावात फोन करून चोर आल्याची खबर दिली.गावकरी बरेच जमा
झाले.या चार जणातील एक जण जमावाच्या हाती लागला जमावाने त्याला खुप मारुन
पोलिसांना कळविले दरम्यान जमावाने मारलेल्या व्यक्तीला पोलिसांनी कडा
येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मत्यू
झाल्याचे सांगितले.सदरील मत्यूदेह आष्टी येथील ग्रामिण रुग्णालयात
शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून दुपार पर्यंत शवविच्छेदन करण्यात
आले नव्हते.दरम्यान घटनास्थळी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अप्पर पोलिस
अधिक्षक विजय कबाडे,पोलिस उपाधिक्षक विजय लगारे,पोलिस निरीक्षक माधव
सुर्यवंशी,एपीआय रियाज शेख यांच्यासह आदिंनी भेट दिली आहे


अधिक माहिती: beed

Related Posts you may like