घराच्या लोखंडी जिन्यात विजेचा प्रवाह उतरला, एकाच कुटूबांतील तिघांचा शॉक लागून मृत्यू

eReporter Web Team

घराच्या लोखंडी जिन्यात विजेचा प्रवाह उतरला
एकाच कुटूबांतील तिघांचा शॉक लागून मृत्यू
मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही बंधु दगावले; गोविंद नगर भागात
घडली आज दुर्देवी घटना
बीड (रिपोर्टर)ः- घराच्या लोखंडी जिन्यामध्ये विजेचा प्रवाह उतरला होता.
या जिन्याला सात वर्षीय मुलीचा हात लागल्याने तिला जबरदस्त शॉक बसला
मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतांना पित्यालाही शॉक बसला. दोन्ही
बापलेक जिन्याला चिकटल्याचे चुलत्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या
दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्देवाने तिघांचाही मृत्यु
झाला. ही घटना सकाळी गोवींद नगर भागात घडली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त
केली जात आहे.

तुळशीराम वडमारे रा.गोवींद नगर बीड यांच्या घराला लोखंडी जिना आहे.
जिन्याच्यावरुन त्यांचे मिटर आहे. मिटरच्या वायरला सपोर्ट करणारी जी तार
असते ती तार त्यांनी जिन्याला बांधली होती. त्यामुळे जिन्यामध्ये आज
सकाळी विजेचा प्रवाह उतरला. या जिन्याला श्रेया तुळशीराम वडमारे वय-7
वर्षे या मुलीचा हात लागला. आणि तिला जबरदस्त विजेचा शॉक लागला. मुलीला
शॉक लागल्याचे पिता तुळशीराम वडमारे वय- 32 वर्षे यांच्या निर्देशनास
आल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेवून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र
त्यांनाही शॉक बसला. पिता आणि मुलीला शॉक लागल्याचे तुळशीराम यांचे बंधु
रमेश वडमारे वय- 45 वर्षे, यांना दिसून आल्यानंतर त्यांनी या दोघांना
वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्देवाने या तिघांचाही शॉक लागून
मृत्यु झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तुळशीराम वडमारे
हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. तर रमेश वडमारे हे रिक्षा
चालक होते. घटनेची माहिती शिवाजी नगर पोलीसंाना झाल्यांनतर पोलीसांनी
घटनास्थळी जावून पंचनामा केला.तिन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा
रुग्णालयात करण्यात आले.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like