अंबाजोगाईच्या उच्चपदस्थ महिला अधिकार्‍याला कोरोना

eReporter Web Team


बीड/अंबाजोगाई (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या  रोज
वाढताना दिसून येत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. काल सकाळी
जिल्ह्यात 15 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर मध्यरात्री एक वाजता पुन्हा 25
रुगण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली
आहे. रात्री एक वाजता पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई येथील एका
उच्चपदस्थ महिला अधिकार्‍याचा समावेश असल्याने तहसीलसह अन्य विभागातील
कर्मचार्‍यात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित महिला अधिकार्‍याच्या
संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू असून त्यांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना
दिल्या जाणार आहेत. रात्री 25 आढळलेल्या बाधितांमध्ये बीड 9, गेवराई 1,
परळी 12, आष्टी 1, माजलगाव 1, अंबाजोगाई 1 असे रुग्ण आहेत.
   जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली असून गेल्या
24 तासात बीड जिल्ह्यात तब्बल 40 बाधीत रुग्ण आढळल्याने प्रचंड खळबळ
उडाली आहे. अंबाजोगाईमधील एक उच्चपदस्थ महिला अधिकारी कोरोनाबाधीत
आढळल्याने शहरात प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित महिला
अधिकार्‍याच्या संपर्कात अनेक कर्मचारी, सर्वसामान्य आलेले आहेत. संबंधित
महिला अधिकारी या कर्तव्यावर असल्याने गेल्या चार-पाच दिवसांच्या
कालखंडात त्यांनी कर्मचार्‍यांच्या बैठकाही घेतल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांसह
नागरिकांचा शोध घेणे सुरू असून या सर्वांना प्रशासनाकडून क्वारंटाईन
होण्याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. कोरोनाचा हा संसर्ग बीड आणि परळी
शहरात मोठ्या प्रमाणावर होत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
महिनाभरापूर्वी कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर असणार्‍या बीड जिल्ह्यात
कोरोना झपाट्याने पसरत आहे. ही वाढ चिंतेत भर घालणारी ठरत असून जिल्ह्यात
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 305 वर जावून पोहचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मध्यरात्री आलेले बाधित रुग्ण
बीड- 35 वर्षीय महिला (रा.चंपावती नगर, बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
30 वर्षीय पुरुष (रा.लिंबा(रुई) पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत) 24 वर्षीय
महिला (रा.लिंबा(रुई) पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत) 27 वर्षीय पुरुष
(रा.अजमेरनगर (बालेपीर)) 44 वर्षीय महिला (रा.जुना वाजार,) 33 वर्षीय
पुरुष (रा.जुना बाजार) 26 वर्षीय पुरुष (बीड तालुक्यातील असुन नेमक्या
पत्त्याबद्यल  ात्री करणे सुरु आहे.) 68 वर्षीय पुरुष (रा.घोसापुरी
ता.बीड) 21 वर्षीय पुरुष (रा.युसुफीया मस्जीद जवळ, शाहुनगर)  गेवराई :-
40 वर्षीय पुरुष (रा.मादळमोही ता गेवराई) परळी :- 42 वर्षीय पुरुष
(रा.इंद्रानगर, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)28 वर्षीय महिला
(रा.इंद्रानगर, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत) 12 वर्षीय महिला (रा.जुने
रेल्वेस्टेशन परळी, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) 40 वर्षीय पुरुष
(रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत) 22 वर्षीय
महिला (रा.जूने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत) 32
वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
34 वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी, पॉझिटीव्ह रुग्णाचा
सहवासीत ) 30 वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी, पॉझिटीव्ह
रुग्णाचा सहवासीत) 36 वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,
पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) 09 वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन
परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत) 70 वर्षीय पुरुष (रा.भोई गल्ली परळी)
38 वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत
) 38 वर्षीय महिला (रा.गंगादेवी ता.आप्टी, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
26 वर्षीय महिला(रा.जदिदजवळा ता. माजलगाव, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
01 - आष्टी 01 -माजलगाव :- 01 - अंबाजोगाई :- 44 वर्षीय महिला
(रा.विमलश्रृष्टी, चनई ता. अंबाजोगाई)

 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like