वडवणीत भाजपाचा रस्ता रोको

eReporter Web Team

वडवणी (रिपोर्टर):-

दुध दरवाढ करावी यासह अन्य मागण्यासाठी आज वडवणी शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. राज्य भाजपाच्या आदेशाने आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी वडवणी तालुका भाजपाच्या वतीने छञपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको करण्यात आला यामध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांची दरवाढ करावी,वडवणी शहराला राष्ट्रीयकृत बँक द्यावी व सर्वा बँकानी त्वरीत पिक कर्ज द्यावे व पिक विम्याचा कालावधी वाढवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या रस्ता रोको मध्ये भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील निवेदन तहसिलदार यांनी स्विकारले.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like