लॉकडाऊनच्या निषेधार्थ शिळ्या भाकरी खाऊन वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर):- सलग पाच महिन्यापासून राज्यामध्ये लॉकडाऊन आहे. अनेक ठिकाणी निर्बंध आहेत त्यामुळे हातावर पोट असणार्‍या मजुराचा रोजगार हिरावून घेतलेला आहे. त्यांना आपले जीवन जगणे मुश्किल होत आहे. त्यामुळे इथुन पुढे राज्य सरकारने लॉकडाऊन लावू नये असे म्हणत ३१ ऑगस्टपर्यंत सरकारने लावलेल्या निर्बंधाचा निषेध करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने शिळ्या भाकरी खाऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. 
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हातावर पोट असणार्‍या लोकांची मोठी संख्या आहे. दररोज काम केले तर त्यांना आपली उपजिविका भागवणे कठीण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या लॉकडाऊन निर्बंधामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. कोरेानामुळे नाही तर उपासमारीमुळे अनेक भुकबळी जातील त्यामुळे ईथुनपुढे तरी राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लावू नये त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीड येथे ही वंचित बहुजन आघाडीने सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आज सकाळी १० वाजता त्यांच्या नगर नाका येथील कार्यालयासमोर शिळ्या भाकरी खात हे आंदोलन केले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like