साध्या पद्धतीने घरातच  बकरी ईद उत्साहात साजरी

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर):- गेल्या पाच-सहा महिन्यापासून देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व सन उत्सव आजपर्यंत अगदी साध्या पद्धतीने घरातच साजरे करण्यात आले आहे. आजची बकरी ईदही सर्व मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने घरामध्ये उत्साहात साजरी केली. मुस्लिम बांधवांनी घरामध्ये ईदची नमाज अदा केली. 
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन योग्य ती काळजी घेवून नियोजन करत आहे. आजपर्यंतचे सर्व सन उत्सव साध्या पद्धतीने घरामध्ये साजरे करण्यात आले. आज मुस्लिम बांधवांची बकरी ईद होती. याबाबतही काही नियमावली शासनाने ठरून दिल्या होत्या. त्यानुसार सर्वांनी याचं पालन करत अगदी साध्या पद्धतीने घरामध्ये बकरीची ईद साजरी करण्यात आली आहे. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like