पेठ बीडमध्ये गुटखा पकडला दोन आरोपीसह २ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर):- पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटख्याची वाहतुक करणारी एक स्वीफ्ट डिझायर गाडी पेठ बीड पोलीसांनी ताब्यात घेवून त्यामधील ६५ हजाराचा गुटखा दोन आरोपीसह एकूण २ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज ११.३० वाजता तेलगाव नाका येथे करण्यात आली. 
पेठ बीड पोलीसांना एका स्वीफ्ट डिझायरमध्ये अवैध गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पेठ बीडचे नारायण उबाळे व ईतर कर्मचार्‍यांनी सापळा लावला असता स्वीफ्ट डिझायर एम.एच.१४-९७०७ या गाडीची तपासणणी केली असता गाडीमध्ये बाबा नावाच्या गुटख्याच्या पाच बॅग त्याची किंमत ६५ हजार व दोन आरोपी ताब्यात घेतले. पेठ बीड पोलीस ठाण्यात नारायण उबाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी शेषेराव बहिरवाळ बाळु बहिरवाळ हे रा.घोसापुरी ता.बीड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, पेठ बीड पोलीस ठाण्याचे पीआय विश्‍वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण उबाळे यांच्यासह आदींनी केली. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like