मोदींनीच भारतात करोना आणला म्हटलं तर चुकलं कुठे?; आंबेडकरांचा सवाल

eReporter Web Team

मोदींनीच भारतात करोना आणला म्हटलं तर चुकलं कुठे?; आंबेडकरांचा सवाल
पुणे: संपूर्ण देशात करोनाचा कहर निर्माण झाला असून त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा टीका केली आहे. परदेशातून येणार्‍या लोकांना रोखण्याची गरज असताना मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात घेऊन आले. त्यामुळे मोदींनीच भारतात करोना आणला असं म्हटलं तर चुकलं कुठं?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. जेव्हा परदेशातून येणार्‍या लोकांना रोखण्याची आणि त्यांची टेस्टिंग करण्याची गरज होती. नेमके त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या लवाजम्याला बोलावून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोदींनीच भारतात करोना आणला असं म्हटलं तर चुकलं कुठे?, असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आंबेडकर यांनी मोदी हे धार्मिक गटाचे नेते असून त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नसल्याची टीका केली होती. राजकीय नेतृत्वाची धमक नसल्याने करोनाच्या संकटातून बाहेर येण्याची मोदींकडे दूरदृष्टी नसल्याचा घणाघातही त्यांनी केला होता. औरंगाबाद मुक्कामी त्यांनी ही टीका केली होती.
’उद्धव ठाकरे यांना कायद्याची समज नाही’
डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आणि पोलिसांसह इतर कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नानंतर देशातील करोना आटोक्यात आला आहे. डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांच्या परिश्रमांमुळे करोनावर मात करता आल्याचा संदेश सरकारने द्यायला पाहिजे होता. मात्र सरकारने तसे केले नाही. आजही केवळ ५ टक्के रुग्णांसाठी ९५ टक्के जनतेला वेठीस धरण्याचं काम सुरू आहे, ते योग्य नाही, असं सांगतानाच भविष्यात आर्थिक संकटाने वंचित घटकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणूनच आम्ही 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like