सर्व कोविड योद्धा महिला भगिनींना यावर्षीची राखी पौर्णिमा समर्पित - धनंजय मुंडे

eReporter Web Team

मोठ्या बहिणींकडून राखी बांधत धनंजय मुंडे यांची राखी पौर्णिमा साजरी


परळी -ऑनलाईन रिपोर्टर 

: राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना आज त्यांच्या मोठ्या भगिनी सौ. उर्मिला ताई केंद्रे व सौ. शकुंतला ताई केंद्रे यांनी रक्षाबंधन निमित्त राखी बांधून औक्षण केले. धनंजय मुंडे यांनी साधेपणाने या वर्षीची राखी पौर्णिमा साजरी केली.

रक्षाबंधन हा सण बहीण भावाचे अतूट नाते अधिक घट्ट करणारा एक अमूल्य दिवस असून, कोरोनाच्या संकट काळात आपले वैयक्तिक आयुष्य विसरून जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या आरोग्य, पोलीस, स्वछता आदी क्षेत्रात कोविड योद्धा म्हणून काम करत असलेल्या सर्व महिला भगिनींना यावर्षीचे रक्षाबंधन समर्पित करत असल्याचा भावनिक संदेश यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

समाज कल्याण मंत्री, तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवत असलेल्या धनंजय मुंडे यांचे कुटुंब व सामाजिक वलय मोठे आहे. दरवर्षी त्यांच्या सर्व भगिनी तसेच मतदारसंघ व बीड जिल्ह्यातील अनेक महिला त्यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्यासाठी येत असतात. परंतु कोरोनाविषयक खबरदारी म्हणून यावर्षी ना. धनंजय मुंडे यांनी अत्यंत साधेपणाने रक्षाबंधन साजरे केले आहे.

ना. मुंडे यांना गंगाखेड येथे भगिनी सौ. उर्मिला ताई केंद्रे व परळीत सौ. शकुंतला ताई केंद्रे यांनी राखी बांधून औक्षण केले तसेच त्यांना पेढा भरवून त्यांच्या हातून सत्कार्य घडावे अशा शुभेच्छा व आशीर्वाद दिले.


अधिक माहिती: बीड

Related Posts you may like