कोरोनाच्या अनुषंगाने परळी  शहर लॉकडाउन करा-पंडितराव दौंड

eReporter Web Teamपरळी (रिपोर्टर)- परळी व काही गावात  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात
घेता परळी शहर  लॉक-डाऊन करावे  अशी मागणी  माजी राज्य मंञी पंडितराव
दौंड यांनी केली आहे
     परळी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या पञात नमुद केले आहे कि,परळी
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.एक एका कुटुंबात व
त्यांचा संपर्कात येणार्‍यांची संख्या 10-15 च्या आसपास दररोज वाढत आहे.
त्याला कारणीभूत या शहरात लॉक डाऊनचा उपाय योजिला जात नाही.व्यापारी आपली
दुकाने सतत उघडी ठेवत आहेत.डेलळरश्र ऊळीींरपलळपस चे तीन तेरा वाजले आहेत,
अशा परिस्थितीत परळी शहर व तालुका लॉक डाऊन करणे अत्यंत गरजेचे आहे असे
वाटते.या शहरातील  कोरोना बाधितांची  संख्या जवळपास 200-250 च्या पुढे
गेल्याचे ऐकण्यात येत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे म्हणून आपण परळी शहर
तालुका  बंद ठेवण्यासाठी तत्काळ लॉक डाऊनचा निर्णय घ्यावा अशी मागणी
माजीमंञी पंडितराव दौंड यांनी प्रशासनाला पञ देऊन केली
आहे.व्यापार्‍यांनी स्वतः या निर्णयास पुढे होऊन सहकार्य करावे व
गरजवंतांना सामाजिक संघटनांनी मदत करावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे-


अधिक माहिती: beed

Related Posts you may like