याला म्हणतात जिद्द, अंधत्वावर मात करत  याला म्हणतात जिद्द, अंधत्वावर मात करत 

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- याही वर्षी अंध असताना जयंत मंकले याने केंद्रीय लोकसेवा आयोगात १४३ वा क्रमांक पटकावत यशाला गवसणी घातली आहे. गेल्या वर्षी जयंत याने या परीक्षेत ५४३ वा क्रमांक पटकावला होता. 
   सलग २०१५ पासून जयंत हा पुण्यामध्ये राहून केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत होता. २०१५ ला त्याला अपयश आले मात्र त्यानंतर त्याने पुन्हा आपण कुठे चुकलो आणि काय केले पाहिजे याची उजळणी करत २०१८ ची केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा दिली. परीक्षेत तो देशभरातील ५४३ वी रँक पटकावत उत्तीर्ण झाला होता. मात्र ५४३ व्या रँकला केेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गट अ किवा ब मध्ये त्याची निवड झाली होती. त्याच्यावर त्याचे समाधान न झाल्याने त्याने या वर्षी परत यशाला गवसणी घालण्यासाठी स्वत: दृष्टीहीन असताना २०१९ युपीएससीची परीक्षा परत दिली आणि परीक्षेत तो १४३ व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. दृष्टीहीन असल्यामुळे लोकसेवा आयोगाने एक वर्षापासून त्याला नियुक्ती दिली नव्हती. कारण दृष्टी नसताना कोणत्या पदावर तो योग्य होतो याचा अभ्यास लोकसेवा आयोगाकडून करण्यात येत असतानाच याही वर्षी तो १४३ व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. १४३ व्या रँकमुळे त्याला आयपीएस या पदावर सहज नियुक्ती मिळाली असती मात्र दृष्टीनतेमुळे कुठल्या पदावर लोकसेवा आयोग त्याला नियुक्ती देते हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like