जिल्हा परिषदेच्या बदल्यांमध्ये ३०० कर्मचारी पात्र

eReporter Web Team

जिल्हा परिषदेच्या बदल्यांमध्ये ३०० कर्मचारी पात्र
बीड (रिपोर्टर)- कालपासून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत वर्ग ३ आणि ४ च्या बदल्या समुपदेशनाने सुरू आहेत. काल चार विभागाच्या बदल्या केल्यानंतर आज सामान्य प्रशासन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, माध्यमिक शिक्षण विभागासह अन्य एक अशा चार विभागांच्या बदल्या सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहामध्ये होत आहेत. 
   या बदल्या कोरोना महामारीच्या अनुषंगाने मे महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्णयात होत आहेत. एकूण प्रशासकीय बदल्या १० टक्के आणि विनंती बदल्या ५ टक्के यांचा समावेश आहे. त्यानुसार चार विभागांतर्गत ३०० कर्मचारी बदलीस पात्र आहेत. त्यामुळे ही बदली प्रक्रिया आज पार पडत आहे. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like