जिल्हाभरात मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात निवेदने 

eReporter Web Team

शिवसंग्राम, मराठा समन्वय समिती, मराठा समाज हितचिंतकांकडून 
राज्य सरकारने मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन 
बीड (रिपोर्टर) मराठा समन्वय समितीकडून आज राज्यभरात मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदने देण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यात देखील शिवसंग्राम, मराठा समन्वय समिती व मराठा समाजातील स्वयंसेवकांनी पुढे येत विविध मागण्यांसंदर्भात आज निवेदने दिली. राज्यात ठाकरे सरकार होऊन ८ ते ९ महिन्यांचा काळ उलटला आहे. या कालावधीमध्ये मराठा समाजाच्या प्रमुख व महत्वाच्या विषयांबाबत स्वतः मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही, समाजाच्या प्रश्नांवर ठाकरे सरकारने  घेतलेली नाही,  तर प्रश्नच नाही, पूर्णपणे सरकारने मराठा समाजच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे हे सर्व समाजच्या निदर्शनास आलेले असल्याचे शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी म्हंटले आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षण टिकवण्यासह विविध मागण्यांसंदर्भात मराठा समन्वय समितीच्या वतीने राज्यभरातुन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्ङ्गत निवेदने दिली गेली. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करत असलेल्या शिवसंग्रामसह इतर काही संघटनांनी एकत्रित येऊन मराठा समन्वय समितीची स्थापना केलेली आहे. आज बीड सह, केज, गेवराई व इतर तालुक्यांमध्ये अशी निवेदने दिली गेली आहेत. 
   मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. या करीता समाजाला आवाज उठवावा लागला तेव्हा कुठे (पान ४ वर)
 मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष ना अशोक चव्हाण यांनी लक्ष घातले आहे. यानंतर व्हिडीओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे काही बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये समाजाला अपेक्षित असणारे शब्द दिले गेले मात्र प्रत्यक्षात वेगळेच राज्य शासन वागले आहे. म्हणून मराठा समाजामध्ये आरक्षणाबाबत मोठी चिंता, काळजी वाढत आहे. सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घ्यावे व आरक्षणाची शासनाने काळजी घ्यावी, मागील सरकारने उच्च न्यायालयामध्ये टिकवलेले आरक्षण महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारनी सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवावे म्हणून आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मराठा समन्वय समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा हा आजपासून राज्यभरात सुरु झाला असून या पहिल्या टप्प्यात राज्यभरातुन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्ङ्गत निवेदने दिली जात आहेत. या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधून घेतले जाणार आहे. आरक्षणासहित मराठा समाजाचे सर्व प्रश्न त्वरित मार्गी लावावेत, जर प्रश्न मार्गी लागले नाही तर मग मोठे आंदोलन घेण्यात येईल अशा इशारा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like