8 ते 10 ऑगस्ट बीडच्या संपूर्ण बाजारपेठा बंद व्यापार्‍यांची होणार कोरोना टेस्ट

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- बीड शहरातला कोरोनाचा वाढता समुह संसर्ग पाहता त्याला रोखण्यासाठी शहरात भिलवाडा पॅटर्ननुसार सुपर स्प्रेडर्स (म्हणजेच जे व्यक्ती रोज मोठ्या प्रमाणावर अन्य लोकांच्या संपर्कात येतात) यांची तपासणी करण्यासाठी 8, 9, 10 ऑगस्ट रोजी बीड शहरातल्या सर्व बाजार पेठा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून या तीन दिवसांच्या कालखंडात व्यापारी, फळ-भाजी विक्रेते, छोटेमोठे व्यवसायिक, दूध विक्रेते यांची तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, बीड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता समुहसंसर्ग रोखण्यासाठी येत्या 8, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी बीड शहारतल्या सुपर स्प्रेडर्स म्हणजेच (जे व्यक्ती मोठ्या प्रमाणावर अन्य लोकांच्या संपर्कात येतात) यांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे या तीन दिवसांच्या कालखंडात बीड शहरातल्या सर्व बाजार पेठा बंद राहणार आहेत. या कार्यकाळामध्ये सर्व प्रकारचे दुकानदार, व्यवसायिक, फळभाजी विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील कर्मचारी व बँकेतील कर्मचारी यांचे कोरोना टेस्ट तपासण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील सर्व नियोजन दुकानदार, पेट्रोल पंप चालक, बँकेच्या मदतीने करण्यात येणार असल्याचे सांगून शहरातील दूध विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाद्वारे नेमलेल्या ठिकाणी तपासणीसाठी जायचे आहे आणि शहराबाहेरून येणार्‍या दूध विक्रेत्यांची तपासणी त्यांच्या गावच्या ग्रामसेवकांनी त्यांनी दिलेल्या ठिकाणी शहरातच करण्यात येणार आहे.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like