केजमध्ये तीन दिवसात २७ रूग्ण

eReporter Web Team

काही व्यापार्‍यांनी आजपासूनच ठेवले व्यवहार बंद; सात ठिकाणी कन्टेनमेंट झोन
केज (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हचे रूग्ण वाढू लागले. केजमध्ये गेल्या तीन दिवसात २७ रूग्ण आढळून आले. या रूग्णावर पिसे गाव येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात सात ठिकाणी कंटेटमेंट झोन लागू करण्यात आले आहे. उद्यापासून सहा दिवस शहर बंद असल्याने आजपासून अनेक व्यापार्‍यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवले असल्याचे दिसून आले. 
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. केज शहरात ३ दिवसामध्ये २७ पेशंट आढळून आले. शहरातील वाढते पॉझिटिव्ह रूग्ण पाहता व्यापार्‍यांनी सहा दिवसासाठी बंद  करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्यापासून सहा दिवस शहर बंद राहणार असले तरी आजपासूनच अनेकांनी आपआपले व्यवहार बंद ठेवले होते. पॉझिटिव्ह रूग्णासाठी पिसेगाव येथे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. शहरातील गोपाळवस्ती, समर्थमठ, धारूर रोड, स्वामी विवेकानंद नगर, कानडीरोड यासह अनेक भागात कंटेटमेंट झोन लागू करण्यात आले आहे. शहरवासियांनी योग्य ती खबरदारी घेवून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सातत्याने प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like