पप्पा तुम्ही लवकर घरी या...आम्ही खुप दुःखी आहोत,डॉक्टरच्या मुलीची भावनिक साद !

eReporter Web Team

 

पप्पा तुम्ही लवकर घरी या...आम्ही खुप दुःखी आहोत
नक्कीच कोरोना जाईल आणि तुम्ही घरी याल...कोरोना योध्दा असलेल्या
डॉक्टरच्या मुलीची भावनिक साद !
माजलगाव (रिपोर्टर)- मी खुप दुःखी आहे कारण तुम्ही मागील कित्येक
दिवसांपासुन तुमच्याच घरांपासुन दुर आहात. नक्कीच कोरोना जाईल आणि तुम्ही
घरी याल..माझ्यासोबत खेळाल आणि कुटूंबीयांना वेळ देत मित्रांसोबत
घराबाहेर फिरण्यास जाताल.. असे भावनिक आवाहन करत कोरोनाला हरविण्यासाठी
लढणा-या आपल्या डॉक्टर वडीलांना त्यांच्या मुलीने सोशल मिडीयाव्दारे ताकद
देण्याचे काम केले आहे.
मार्च महिण्यापासुन जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेंव्हापासुन
ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन रूद्रवार यांनी कोव्हीड
- 19 चा प्रमुख म्हणुन चार महिण्यापूर्वी चार्ज घेतला. तेंव्हापासून तर
आजतागायत ते कुटूंबीयांपासुन दुर आहेत. कुटूंबातील सदस्यांची भेट देखिल
नाही. तालुक्यात कोव्हीड- 19 ला रोखण्यासाठी केसापूरी वसाहत येथील
समाजकल्याण हॉस्टेलमध्ये कोव्हीड केअर सेंटर उभारले आहे. याठिकाण स्वॅब
कलेक्शन सेंटर देखिल आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व वाढता संसर्ग
रोखण्यासाठी डॉ. रूद्रवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील आरोग्य
उपकेंद्र, आरोग्य केंद्रात जोरदार काम सुरू आहे. तालुक्यातुन आतापर्यंत
1200 स्वॅबची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये 50 च्या वर पॉझिटीव्ह
रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी अध्र्याच्या वर लोकांवर यशस्वी उपचार करून
त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या कामी कोव्हीड केअर सेंटरला
डॉक्टर सहित सात ते आठ कर्मचारी असुन कोरोनाला थोपविण्यासाठी हे कोव्हीड
योध्दे आपल्या जिवाची बाजी लावत आहेत तर कुटूंबाची काळजी असल्याने व
कुटूंब सुरक्षित रहावे यासाठी डॉ. रूद्रवार हे मागील तिन ते चार
महिण्यांपासुन घराबाहेर आहेत. कुटूंबीयांपासुन दूर राहत असल्याने
त्यांच्या मुलींनी त्यांची भेट व्हावी यासाठी कोरोना व्हायरस लवकरच संपेल
आणि तुम्ही घरी याल... अशी भावनिक साद कोरोनाला हरविण्यासाठी लढणा-या
आपल्या डॉक्टर वडीलांना त्यांच्या मुलीने घातली आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like