१२ ऑगस्ट पासून बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टीसह केजमध्ये १० दिवसाची संचारबंदी

eReporter Web Team

१२ ऑगस्ट पासून बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टीसह केजमध्ये १० दिवसाची संचारबंदी
बीड | रिपोर्टर
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊले उचलले आहेत. गेवराईनंतर बीड शहरात अँटिजेन टेस्ट केल्यानंतर काल तब्बल ८६ तर आज दुपरपर्यंत तब्बल ६२ पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा मोठा संसर्ग झाल्याने निष्पन्न झाले आहे. हा समूह संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दि.  १२ ते २२ ऑगस्ट दरम्यान बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टीसह केजम १० दिवसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंद काळामध्ये  अत्यवश्यक सेवा सुरु राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
     बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा ते १२ दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यातील  बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टीसह केजमध्ये १० दिवसाची संचारबंदी लागून करण्यात आली आहे. ही संचारबंदी दि. १२ ते २२ ऑगस्ट दरम्यान असेल. व या दरम्यान सदरील शहरे बंद राहाणार आहेत. यामध्ये दूध विक्री घरपोहच सकाळी ७ वाजल्यापासून ते ९ पर्यंत  सुरु राहणार आहे. खाजगी व शासकीय रुग्णालय केवळ रुग्णांलयाशी सलग्ण औषध दुकाने  सुरु राहतील (सर्वांनी त्यांना जे औषधे गोळ्या लागतील त्या दि. ११ ऑगस्ट २०२० पर्यंत खरेदी कराव्यात.) संचारबंदीच्या काळात प्रसारमाध्यमे सुरु राहणार असून घरगुत्ती गॅस सेवा संबधीत एजन्सी धारकांनी आपले एजन्सीचा गणवेश परीधान करावा व ओळखपत्र बाळगावे. यासह इतर नियम लागू करण्यात आलेे आहेत.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like