अहवाल पॉझिटिव्ह, आरोग्य पथकाला पाहताच रुग्णाची धूम - माजलगावतील घटना

eReporter Web Team

अहवाल पॉझिटिव्ह, आरोग्य पथकाला पाहताच रुग्णाची धूम - माजलगावतील घटना

माजलगाव (रिपोर्टर ) : शहरातील जिजामाता नगर भागात राहणाऱ्या 30 वर्षीय युवकाला कोरोना झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे उपचारासाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी आरोग्य पथक व पोलीस गेले. मात्र त्यांना पाहताच रुग्णाने धुम ठोकल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी घडली. पोलिसांच्या एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला ताब्यात घेण्यात यश आले. माजलगाव शहरात मागील आठ दिवसात कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी माजलगाव तालुक्यात शनिवारी 19 रूग्ण पाँझीटीव्ह निघाले होते त्यात माजलगाव शहरातील तानाजी नगर भागातील एका युवा रूग्णाचा समावेश होता. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोग्य सेवक ,पोलीस , नगरपालिकेचे कर्मचारी त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्याने घराबाहेर येऊन तेथुन धुम ठोकली. यामुळे सर्व यंत्रणा व नागरिक हैराण झाले व त्याच्यामागे पोलीस व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पिच्छा केला व एक तासाच्या अथक परिश्रमानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तो पर्यंत त्या रुग्णाने पळत असतांना 2-3 जणांचा धडक दिल्याचे नागरिकांनी सांगितले. त्या रूग्णाला ताब्यात घेताच पोलीस , आरोग्य यंत्रणा , नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिकांनी निश्वास सोडला.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like