
----------------------
गेवराई (रिपोर्टर) वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने लॉकडाऊन मागे घेऊन
सर्व व्यवहार पुर्ववत करावे तसेच एसटी बस चालु कराव्यात या मागणीसाठी काल
बुधवार दि.12 रोजी गेवराई शहरात तहसिल कार्यालयाला निवेदन व बसस्थानका
समोर डफली आंदोलन केले, परंतु या विषयी प्रशासनाला कोणत्याही प्रकारची
पुर्व कल्पना न देता हे आंदोलन केल्यामुळे वंचित बहुजन आघाडी
तालुकाध्यक्षासह अन्य काही जनावर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने बुधवार
दि.12 रोजी लॉकडाऊन मागे घेऊन सर्व व्यवहार पुर्ववत करावे तसेच एसटी बस
चालु कराव्यात या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. परंतु गेवराई
तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी यांच्या कडून पोलीस प्रशासनाला कोणत्याही
प्रकारची पुर्व कल्पना किंवा निवेदन न देता अचानक पणे गेवराई शहरातील
बसस्थानका समोर डफली आंदोलन करून निवेदन देण्यासाठी गेवराई तहसिल
कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन
करत कसलेही सामाजिक अंतर न ठेवता पाच पेक्षा अधिक लोक एकत्रीत येऊन
पंचायत समिती कॉर्नर ते तहसिल कार्यालय अशी पायी रॅली काढली असल्याने
गेवराई वंचित बहुजन आघाडी तालुकाध्य सय्यद सुभान यांच्यासह बंटी सौंदरमल,
किशोर भोले, सतीश प्रधान, कैलास भोले, रंजित शिंदे, सुधाकर केदार, प्रमोद
निकाळजे, प्रदिप शिंदे, आकाश निकाळजे, बाळु पटेकर, डॉ.रामहरी नागरे,
वचिष्ठ आबुज, अजय वाव्हळ, भैय्यासाहेब वाव्हळ, किशोर चव्हाण आदीसह अन्य 4
ते 5 जनांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या
प्रकरणी पुढील तपास पो.कॉ. राजु वाघमारे करीत आहेत.
अधिक माहिती: beed