
बीड (रिपोर्टर)-, आष्टी, अंभोरा, जामखेड, अहमनगरसह अन्य पोलिस ठाण्यात
खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे, दंगा, खंडणी, खुनाचा
कट यासह अदाी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कडा येथील अशोक किशन
जाधव या गुंडाविरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करत त्याची हर्सूल
कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार
यांनी जिल्ह्यातील गुंडांचे व वाळु माफियांचे उच्चाटन करण्याचे धाडसी
पाऊल उचलले असून त्याअतर्ंगत या कारवाई सुरू आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड जिल्ह्यातील माफियागिरी
आणि गुंडगिरीचे समुळ नष्ट कण्याहेतू एमपीडीईए कायद्याअंतर्गत कारवाई सुरू
केली असून कडा येथील सुंदरनगर भागात राहणारा अशोक किशन जाधव या ३० वर्षीय
गुंडाविरुद्ध अंभोरा, जामखेड, आष्टी, अहमदनगर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत
खून, खुनाचा कट, खंडणी यासह आठ गंभीर गुन्हे दाखल असून यापैकी पाच गुन्हे
हे आष्टी पोलिसात दाखल आहेत. सदरील गुंडाविरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत
कारवाईची शिफारस जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली होती. त्यांनी सदरील
गुंडास एमपीडीए कायद्यार्ंगत कारवाई करून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी
करण्यात आली आहे. भविष्यात गुंडगिरी करणार्या व कायद्याला न
जुमानणार्या व्यक्तींविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर कारवाई
करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले. सदरची कारवाई ही
पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय
पोलिस अधीक्षक विजय लगारे, पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या
मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे,
सपोनि. एस.बी. पठाण, अभिमन्यू औताडे, पोलिस नाईक गरजे, भिसे, गायकवाड,
दुधाळ, करंजकर यांनी केली आहे.
अधिक माहिती: beed